नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे हा प्रभाग दुष्काळग्रस्त झाल्याचा आरोप या प्रभागाचे नगरसेवक राहुल दिवे यांनी केला आहे. यांसदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर आता चार टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकण या धरणांमध्ये आरक्षणाचे मुबलक पाणी असतानाही प्रत्यक्षात महापालिकेचे वितरणाचे नियोजन नसल्याने अनेक भागात टंचाई जाणवत आहे. मध्यंतरी सिडकोतील दत्तनगर भागात असाच प्रकार घडला होता. त्याठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यापाठोपाठ आता आगर टाकळी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये असाच प्रकार घडल्याची तक्रार आहे.प्रभाग सोळामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. ज्या इमारतीत यापूर्वी दोन हजार लिटर्स पाणीपुरवठा होत होता. त्याठिकाणी ७० ते ८० लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांना पाण्यासाठी भ्रमंती करावी लागत आहे.नाशिकरोड भागात आज पाणीपुरवठा बंदमहापालिकेच्या नाशिकरोड व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणीपुरवठा करणाºया गुरु त्व वाहिनीवरील मेन इनकमिंग व्हॉल्व गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राचे आवारात नादुरु स्त झाला आहे. यामुळे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. सदरचा व्हॉल्व तातडीने दुरु स्तीचे काम गुरुवारी (दि. ३०) करण्यात येणार असल्याने नाशिकरोड विभागात पाणीपुरवठा होणार नाही. त्याचबरोबर पूर्व विभागातील दोन प्रभागातदेखील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. दुरुस्ती कामामुळे नाशिकरोड विभागातील सर्व प्रभाग व नाशिक पूर्वमधील प्र. क्र . १६ व २३ मधील संपूर्ण परिसररत गुरुवारी (दि.३०) सकाळी नऊ वाजेपासून व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी (दि.३१) पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेने कळवले आहे.४शहरासाठी महापालिकेकडून तीन धरणांत आरक्षण घेण्यात आले आहे ते मुबलक असतानाही नियोजनाच्या अभावामुळे शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. सिडकोतील कोकण भवन परिसरातदेखील अशाच प्रकारे पाण्याची समस्या वाढली आहे.
नाशिकरोडला पाणीबाणी, टाकळीला चार टॅँकरने पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:39 AM