वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यात पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुक्यातील तांदूळवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायत सदस्य कुसुमबाई पडवळ, वैशाली शिंदे, विश्वंभर सैद, रतन पळसकर यांनी टँकरद्वारे गावात पाणी वाटप सुरू केले आहे.
पाण्यासाठी महिलांची धावपळ या निमित्ताने कमी झाली आहे. महिलादिनी ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील शिंदे यांच्या हस्ते पाणी वाटप कामाचा शुभारंभ करण्यात आला. दर सोमवारी पाणी वाटप सुरू राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बापू पडवळ यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी म्हसू पिंगट, दौलत पळसकर, नानासाहेब शिंदे, संपत पळसकर, निवृत्ती पिंगट, मेजर नवनाथ सैद, समाधान सावंत, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, सुरेश गोराणे, चंद्रकांत पासेकर, सीताराम शिंदे, मारुती शिंदे, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब पडवळ, सुदाम शिंदे, सचिन पडवळ, ज्ञानेश्वर आवारे, रूपेश पडवळ, निवृत्ती पळसकर, अशोक चव्हाण, दीपक कांदळकर, माधव शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- ०९ तांदूळवाडी वॉटर
तांदूळवाडी येथे महिलादिनी टँकरद्वारे पाणी वाटपाचा शुभारंभ करताना ग्रामपंचायत सदस्य.
===Photopath===
090321\09nsk_45_09032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०९ तांदुळवाडी वॉटरतांदुळवाडी येथे महिलादिनी टँकरद्वारे पाणी वाटपाचा शुभारंभ करताना ग्रामपंचायत सदस्य.