सर्वतीर्थ टाकेद( वार्ताहर) इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड परिसरातील जवळपास अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या ठाकुरवाडीत इगतपुरी अॅग्रो डीलर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातूनमोफत टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा पाऊस पडे पर्यंत असणार आहे.याप्रसंगी इगतपुरी तालुका अधिकारी संजय शेवाळे,तालुका कृषी अधिकारी कैलास भदाणे यांच्यासह इगतपुरी ?ग्रो डीलर चे अध्यक्ष सोमनाथ काळे,मुकेश बोथरा,देवचंद काळे,बाळू सुराणा ,पंकज भाऊ घोटी,भाऊसाहेब बिन्नर,धीरज परदेशी,गणेश आवारे ,जितू नाईक,दत्तू सहाणे,रामदास गाढवे, आदी यावेळी उपस्थित होते. तर अरु ण वाजे आणि सागर वाजे यांनी मोलाचे सहकार्य केले.अत्यंत दुष्काळसदृश परिस्थितीत एकीकडे मुक्या जनावरांना चारा पाणी नाही,सगळीकडे कडक दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतांना इगतपुरी अॅग्रोडीलर चे पदाधिकारी आमच्या सातशे लोकसंख्या असलेल्या ठाकुरवाडीतील ग्रामस्थांसाठी मोफत पिण्याचे पाणी घेऊन आले. हे आमच्या ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी म्हणता येईल.-नामदेव आवाली ,ग्रामस्थ ठाकुरवाडी खेड.
खेड येथील ठाकूरवाडीला टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 3:38 PM