तालुक्यातील वावी येथे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख वितरक समित माहेश्वरी यांच्या पुढाकाराने स्टील व्यापारी संजय पगार, प्रकाश महाले, गायखे, बो-हाडे, माळोदे यांनी एकत्रित येत दुष्काळी भागाना टॅँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुष्पक स्टील या कंपनीचे तालुक्यातील विक्रेते अरूण वारूंगसे यांनी याबाबत महत्वाची भूमिका घेतली. वावी येथे दररोज बारा हजार लिटरचा टँकरद्वारे चार फेºया करण्यात येणार आहे. तसेच गुळवंच येथील चारा छावणीस २४ हजार लिटर पाणी दररोज देण्यात येणार आहे. उद्योजकांच्या वतीने तालुक्यातील पिण्याचे पाण्याची दाहकता थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन वाजे यांनी केले. याचा आदर्श घेऊन उद्योजकांनी दुष्काळ निवारणाच्या कार्यात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. पदाधिका-यांनी गुळवंच येथील चारा छावणीस भेट देवून पशुधनास दररोज २४००० हजार लिटर पाणी देण्याची व्यवस्था देखील केली. याप्रंसगी सुमित माहेश्वरी, अरूण वारूंगसे, बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, पंचायत समिती सदस्य रोहिणी कांगणे, गुळवंचच्या सरपंच कविता सानप, उपसरपंच सुनिता कांगणे, नंदूशेठ मालपाणी, दिपक वेलजाळी, इलाहीबक्ष शेख, विलास राजेभोसले, रामनाथ कर्पे, सुभाष काटे, भगवान सानप, विष्णू सानप, भाऊदास सिरसाट, परसराम कांगणे, अर्जुन कांगणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यापारी असोशिएशनकडून दुष्काळी भागात टॅँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 6:58 PM