पेठ : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गंत परिसरातील अनेक गावांत सार्वजनिक ठिकाणचे पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहेत. यातील पाणीसाठा उपसा होत असो की नसो, याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र देत असते.कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी दर महिन्याला पाणी नमुने गोळा करतात. खास करु न जमिनीत असलेला पाणीसाठा जास्त दिवसाचा झाल्याने विविध प्रकारचे रोग उद्भवण्याची भीती असते. जसे मुडदूस, मुत्रपिडांचे विकार, दंत व हाडाचे फ्लोरोसिस आदी रोग उद्भवू शकतात. अशा रोगांवर नियत्रंण ठेवण्यासाठी स्रोता भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, १५ मीटर अंतरापर्यत सांडपाणी साचून न देणे, शौचालय, गाईगुरांचा गोठा स्रोतापासून १५ ते २० मीटर अंतरापेक्षा जास्त लांब असावा. टाकीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या व्हॉल्हला गळती नसावी. नळाला तोटी असावी, महिन्यातून दोन वेळेस टाकी स्वच्छ धुवून काढावी. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विहिरीत ब्लिचिंग पावडर (टी सी एल) टाकावी. घरगुती पिण्याच्या पाण्याच्या माठात मेडीक्लोर टाकावे. अशी काळजी घेतल्यास पाण्यापासून होणारे रोग नाहीसे होतील. अशी माहिती कोहोर आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाळु अहिरे, हरी आहेर व किसन ठाकरे यांनी धूळघाटगावी पाणी तपासणी नमुने नेण्यासाठी आले असतांना दिली.पाणी नमुने जिओफेन्सिंग अँपद्वारेकोहोर प्रा.आ.केंद्रातंर्गंत अठरा गावे व आठ पाडे असून मान्सून पूर्व व मान्सून पश्चात दोन वेळा पाणी पुरवठा आण िस्वच्छता सर्व्हेक्षण केले जाते. यामध्ये जैविक पाणी नमुने पेठ येथील ग्रामिण रु ग्णालय प्रयोगशाळेत तर रासायनिक पाणी नमुने सुरगाणा येथील उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविले जाते. रासायनिक पाणी नमुने हे जिओफेन्सिंग मँप अँपद्वारे केले जाते. आणि पाणी नमुने तपासणीनंतरच ग्रामपंचायतला चंदेरी, हिरवे, पिवळे व लाल कार्ड देण्यात येते.-के.पी.ठाकरे,प्रा.आ.केंद्र- कोहोर, ता.पेठ
दर महिन्याला केली जाते पाण्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:22 PM
पेठ : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गंत परिसरातील अनेक गावांत सार्वजनिक ठिकाणचे पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहेत. यातील पाणीसाठा उपसा होत असो की नसो, याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र देत असते.
ठळक मुद्देमहिन्यातून दोन वेळेस टाकी स्वच्छ धुवून काढावी.