नांदूरवैद्य : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या बेलगाव कुºहे येथे दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी गावातील नागरिकांची भटकंती पाहुन येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास गुळवे यांनी स्वमालकीच्या विहिरितून अंबिका मातेच्या मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत पाणी दिले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेलगांव कुºहे या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी तिसऱ्या दिवशी का होईना मिळते. परंतु नेहमीच्या वापरासाठी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे जनावरांना पिण्यासाठी तसेच महिलांना वापरण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने पाण्यासाठी करावी लागणारी वणवन थांबली आहे. प्रसंगी पिकांना पाणी देणे बंद करु न गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे पाण्यासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबावी या हेतूने कैलास गुळवे यांनी दिवसाचे विहिरीतून वीजपंप सुरु केला आहे. त्यामुळे नेहमीच पाणी टंचाई पाचविला पूजलेल्या येथील लोकांसाठी गुळवे हे जलदाता ठरले आहे.
पाणीटंचाईच्या काळात भागविली गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:23 PM