शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

त्र्यंबकेश्वर  तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:03 AM

तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत. अत्यंत खेदाची बाब अशी दिसून येत आहे की, पाणीटंचाईसारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर शासन यंत्रणाच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी टँकर लावल्यामुळे टँकरचालकांवर कोणाचेच लक्ष नाही. वास्तविक अंबोली धरणातील पाण्याची पातळी झिरो आहे. सध्या डेडस्टॉकमधून त्र्यंबक शहरासाठी पाणी देण्यात येत आहे, पण टँकरचालक जवळचा जलाशय म्हणून अंबोलीचीच निवड करून अंबोली धरणातून टँकर भरतात. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊन त्र्यंबक शहराचा जलसाठा कमी होऊ शकतो.  मुळेगाव व तेथील पुंगटवाडी मिलनवाडी वगैरे वाड्यांना मुळेगावचे सरपंच नामदेव काशीराम सराई हे एप्रिलपासून स्वखर्चाने टँकर पुरवित आहेत. सरपंच सराई यांचे काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे. मागील वर्षापर्यंत मुळेगाव व तेथील वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जैन फाउण्डेशन पाणीपुरवठा करीत असे. यावर्षी सरपंचच पाणीपुरवठा करीत असल्याने जैन समूहाच्या वतीने मेटघर या सर्वात उंच ठिकाणी पाच हजार लिटर्सने मेटघर किल्ला व त्याच्या दोन्ही बाजूला दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याने मेटघरची दोन्ही बाजूची गैरसोय मिटली आहे. मेटघर ही तालुक्यातील सर्वात मोठी टंचाईची समस्या होती. जैन समूहाच्या पटणी यांनी ही बाब हेरून मेटघरच्या दोन्ही बाजूच्या पाड्यांना पाण्याची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे. मेटघरच्या पाणीपुरवठ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी आवाज उठविल्याने जेसीबीने रस्ता दुरुस्त करून पाच हजार लिटर्सचा टँकर आता व्यवस्थित पुरतो. तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई सोमनाथनगर, देवळा (आडगाव), मुरंबी, बेरवळ व मुळवड या गावांना व त्याचे पाडे, वाड्या या ठिकाणी आहे.देवळा- करंजविहीर, टोकपाडा, काकडवळण, रानघर, भासवड, नांदुरकीपाडा, बुरुडपाडा, उंबरणापाडा व राउतमाळतर.बेरवळ- पांगारपाणा, कुत्तरमाळ, उंबरदरी, कौलपोंडा आदी.  मूळवड- घोटबारी वळण, सावरपाडा, करंजपाणा आदी पाच गावे वाड्या पाडे या ठिकाणी पाच टँकर मंजूर होऊन फक्त चार टँकर सध्या सुरू आहेत. येत्या एकदोन दिवसात पाचवा टँकर सुरू होऊन एकूण टँकरची संख्या आता तालुक्यात पाच होईल. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी टँकर सोमनाथनगर, गणेशगाव वा. देवळा, मुरंबी, गावठा, बेरवळ व त्यांच्या वाडे पाडे येथे दोन असे चार व आज किंवा उद्या एक टँकर सुरू होऊन टँकरची संख्या पाच होईल.मनमानी : परस्पर टॅँकर बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोपत्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या तीन टँकरपैकी दोन टँकर मुरंबी आणि बेरवळ या दोन्ही गावांच्या वाड्या, पाडे यांना पाणीपुरवठा करणारे टँकर उंच भागात चढत नसल्याने टँकरचालकानेच परस्पर बंद केले आहेत. आता म्हणे पाच हजार लिटर्सचे टँकर आणणार आहेत; मात्र अद्याप बंद करण्यात आलेले टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. आता तालुक्यात केवळ सोमनाथनगर, गणेशगाव, विनायकनगर, शिवाजीनगर, दिव्याचा पाडा आदी गावे, पाडे येथे तीन खेपा होत आहेत. दर माणशी २० लिटर पाणी देण्यात येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई