गिरीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनावर बिंबित झालेल्या एका पाइप कंपनीच्या जाहिरातीचे स्लोगन असलेल्या ‘अख्या गावात पाण्याची बोंब......अन् पाटलाच्या शेतात भरघोस पीक!’ या घोषवाक्याचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील धनेर येथील शेतकऱ्यांना आला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया ४२ खेडी योजनेच्या पाण्यावर डाळिंबबाग फुलवणाºया सरपंचाविरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली आहे.सध्या पसिरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ ग्र्रामस्थांवर आली आहे. अशा परिस्थितीमध्ये धनेर येथे सरपंच चंद्रभान कदम पाटील यांनी गावाला पाणीपुरवठा करणाºया पाइपलाइनवर टॅप टाकून थेट आपल्या विहिरीत शासकीय योजनेचे पाणी बेकायदेशीररीत्या घेतले असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. सध्या दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक गावांमध्ये टॅँकरच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.मात्र धनेर येथील सरपंचाने शासकीय पाणीपुरवठा योजनेचे पाणी थेट आपल्या विहिरीत घेऊन या पाण्यावर डाळिंबबाग फुलवली असल्याची तक्रार सुभाष वाघ, बाजीराव कदम, विनायक पवार, राजेंद्र जाधव, राजेंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. शासकीय पाण्याचा बेकायदेशीररीत्या होत असलेल्या वापराबाबतची व्हिडीओ क्लीप असल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.ऐन दुष्काळात शासकीय योजनेच्या पाण्याच्या होणाºया बेकायदेशीर वापराबाबत कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान धनेर येथील ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामस्थांच्या समक्ष पंचनामा करून कार्यवाहीसाठी पंचायत समितीकडे पाठवला आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार आहे.तालुक्यात कुठेही शासकीय योजनेच्या पाण्याची चोरी होत असल्याचे आढळून आल्यास पाणीचोरांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांनी दिले आहे.धनेर येथे ४२ खेडी योजनेच्या कथित पाणीचोरीबाबत चौकशी सुरू असून, संंबंधित दोषी आढळ्ल्यात कडक कारवाई करण्यात येईल. तालुक्यात इतरत्र कुठेही पाण्याची चोरी होत असल्यास पाणीचोरांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.- जे.टी. सूर्यवंशी गटविकास अधिकारी, नांदगाव
गावाचे पाणी सरपंचाच्या विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:19 AM
मनमाड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनावर बिंबित झालेल्या एका पाइप कंपनीच्या जाहिरातीचे स्लोगन असलेल्या ‘अख्या गावात पाण्याची बोंब......अन् पाटलाच्या शेतात भरघोस पीक!’ या घोषवाक्याचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील धनेर येथील शेतकऱ्यांना आला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया ४२ खेडी योजनेच्या पाण्यावर डाळिंबबाग फुलवणाºया सरपंचाविरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली आहे.
ठळक मुद्देधनेरे येथील घटना : ग्रामस्थांनी केली पंचायत समितीकडे तक्रार