सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो (भगतवाडी) येथे पहेचान प्रगती फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने या गावासाठी पाच हजार लिटर पाण्याची टाकी व पाइपलाइनसह सुविधा उपलब्ध करून देत उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. इगतपुरीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या भावली खुर्द धरणापासून दोन किमी अंतरावरील पिंप्री सदो (भगतवाडी) येथे सुमारे सहाशे आदिवासी लोकवस्तीच्या वाडीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. वर्षानुवर्षे पाण्याचा संघर्ष करत असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या पदरी कायमच निराशा पडत असे. परंतु या वाडीवरील जि. प. शिक्षक प्रमोद परदेशी यांनी यावर मात करत येथील आदिवासी बांधवांची पाण्यापासून होणारी वणवण कायमचीच दूर केली आहे. दरवर्षी जानेवारी ते जूनअखेर येथे कायम पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असे. या वाडीतील महिलांना रोज पिण्याच्या पाण्यासाठी सकाळी, रात्री-बेरात्री भटकंती करावी लागत होती. ही समस्या जि. प. शिक्षक परदेशी यांनी प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून कायमची दूर केली आहे. सर्व माहिती तत्काळ प्रगती फाउंडेशनच्या सदस्यांना कळवताच त्यांनी लगेच पन्नास हजार रुपये मदतीचा हात दिला व आवश्यक साहित्यदेखील खरेदी करून देत, पाण्याची टाकी व पाइपलाइनदेखील करून दिली व पुढील कामासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची भेट घेऊन कामाला सुरु वात केली. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पेहेचान प्रगती फाउंडेशन सदस्यांना खूपच समाधान वाटले. त्याचप्रमाणे मलादेखील मनापासून आनंद वाटला, असे प्रतिपादन प्रमोद परदेशी यांनी केले. त्याचप्रमाणे या कामात त्यांना सहकारी शिक्षक सिद्धार्थ सपकाळे व वैभव गर्गे यांनीदेखील मदत केली आहे.
पाण्यासाठीची भटकंती थांबली पिंप्री सदो : पाण्याची टाकी व पाइपलाइनसह सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:35 AM
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो (भगतवाडी) येथे पहेचान प्रगती फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने या गावासाठी पाच हजार लिटर पाण्याची टाकी व पाइपलाइनसह सुविधा उपलब्ध करून देत उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
ठळक मुद्दे वाडीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होतापाण्यासाठी सकाळी, रात्री-बेरात्री भटकंती करावी लागत होती