सिन्नर : रामनगरी व भगत मळा परिसरात पाणीपुरवठा करणारी सिन्नर नगर परिषदेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.रामनगरी व भगत मळ्यासाठी नगर परिषदेची १५० मिमीची पाइपलाइन पाण्याचा जास्त दाब आल्याने फुटल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. आडवा फाटा भागात सदर पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आयसीआयसीआय बँकेपर्यंत पाणी गेले होते. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले होते. सदर जलवाहिनी फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सांगितले. बुधवारी सकाळपर्यंत सदर जलवाहिनीचे काम पूर्णहोणार असल्याचे डगळे म्हणाले. रामनगरी व भगत मळा परिसरात एक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
वाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 2:20 AM
सिन्नर : रामनगरी व भगत मळा परिसरात पाणीपुरवठा करणारी सिन्नर नगर परिषदेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
ठळक मुद्देसिन्नर : युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम; पाणीपुरवठ्यावर परिणाम