खामखेडा : वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसोदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोतकोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्त्र प्राणी डोगर पायथ्याशी असलेल्या मळयामघील शिवारात, त्याचप्रमाणे हे प्राणी गावात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगी पर्यत डोंगराच्या पर्वत रागा आहेत. या पर्वत रांगाच्या मध्ये तिळवण किल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षापर्यत भरपूर पाणी होते. या विहिरित खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहीरित उतरून पाणी पित असे. परंतु या विहिरीचे कठाडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे डोंगरात पाणी नाही.या पर्वत रागामध्ये बिबटयासह अन्य जंगली प्राण्याचे प्रभाव क्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर-दºयामघील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ डोंगर पायथ्याजवळी मळयातील वस्तीवर येत असल्याचे पहावयास मिळत आहे.वन विभागाने या वन्यप्राण्याच्या पाण्यासाठी डोंगरामघ्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधारात परिसरात भक्ष्यांच्या व पाण्याच्या शोर्धात फिरतात. गेल्या दोन दिवसांपासून खामखेडा गावात अन्न व पाण्याचा शोधार्थ तीन वानराचा खामखेडा गावात मुक्काम आहे. लोक त्यांना कुतूहलाने खायला व प्यायला देत आहेत.वन विभागाकडून या वन्य प्राण्यासाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे, किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरीच्या दुरस्ती करण्यात येऊन त्या विहिरितील पडलेला गाळ काढला तर पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे. या विहिरीला उन्हाळयात पाणी असते. त्यामुळे वनविभागाने वन्य प्राण्यासाठी जंगल, वनतळे व बुटीच्या विहिरिची दुरुस्ती करावी आशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(फोटो ०५ खामखेडा) अन्न व पाण्याचा शोधार्थ खामखेडा गावात आलेले वानर.
पाणी, अन्नच्या शोधार्थ वन्य प्राणी गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:49 PM
खामखेडा : वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसोदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोतकोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्त्र प्राणी डोगर पायथ्याशी असलेल्या मळयामघील शिवारात, त्याचप्रमाणे हे प्राणी गावात येऊ लागले आहेत.
ठळक मुद्दे लोक त्यांना कुतूहलाने खायला व प्यायला देत आहेत.