नाशिक : कुंभमेळ्याच्या कामासाठी नियुक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी मोबाइल अॅपद्वारे केली जाणार असून, त्यासाठी टॅब खरेदी करण्यात येणार आहे. पर्वणी कालावधीनंतर हेच टॅब पाणीपुरवठा विभागाच्या स्पॉट बिलिंगसाठी वापरण्यात येणार आहे. महापालिकेचे सुमारे सात हजार कर्मचारी असून, कुंभमेळ्यात बहुतांशी कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय कामासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी जातील तेव्हा एवढ्या मोठ्याप्रमाणात विखुरलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे महापालिकेत आता मोबाइल अॅपद्वारे हजेरी घेतली जाणार आहे. त्यासाठी मोबाइल आणि टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. कुंभमेळ्याच्या तीन पर्वण्या असून, त्यानंतर हे मोबाइल आणि टॅब पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. पालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून महावितरणाच्या धर्तीवर स्पॉट बिलिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हे टॅब आणि मोबाइल त्यांना पाणी मीटरचे रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. टॅबद्वारे मीटरवरील रिडिंग घेऊन ब्लू टूथ प्रिंटरच्या माध्यमातून तत्काळ बिले देण्याची योजना आहे.
टॅबद्वारे आता पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग
By admin | Published: May 31, 2015 12:42 AM