चांदवड : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानासाठी निवड झालेल्या चांदवड तालुक्यातील ४९ गावांपैकी २२ गावांमध्ये जोरदार श्रमदान झाले. त्यात राजदेरवाडी , नन्हावे, पाटे, गोहरण, दरेगाव, शिरसाणे, रेडगावखुर्द येथे पाणी अडविण्यासाठी महाराष्टÑ दिनी सर्वांनीच श्रमदान केले, तर नन्हावे येथे नवदाम्पत्यांनी तर पाटे येथे चांदवड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. तालुक्यातील सहभागी गावांमध्ये तुफान आलंया या अंतर्गत सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी, यांच्या सहभागामुळे पाण्याची लोकचळवळ उभी राहत आहे.दरेगाव येथे मालेगाव तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७० मीटर सलग समतलचर केला. उर्धुळ येथे ताहाराबाद व नामपूर मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मातीबांधातील गाळ काढण्याचे काम केले. रेडगाव येथे नांदगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ७० मीटर बांध व बंदिस्तीची कामे केली. तालुक्यातील पाटे येथे चांदवड तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रमदान केले. यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनीही श्रमदान केले. यावेळी उत्तम आवारे, भाऊसाहेब आहिरे, गोरक्षनाथ लाड, पोपट सोनवणे, संजय शेळके, वंदना भालेराव, सरपंच जयश्री ठोके, प्रकाश चव्हाण यांचा समावेश होता.रेडगाव खुर्द येथे श्रमदानरेडगावला नांदगाव कृषी विभागाचे तसेच चांदवड कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी शेतकरी ज्ञानेश्वर काषळे यांच्या शेतात शंभर मीटर कंपार्टमेंट बंडिंंग्जची कामे केली. या स्पर्धंेतर्गत रेडगावला २७०० रोपे तयार केली असून, २१० माती नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. दहा शेततळी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात आली. तर ९० शोषखड्डे आदी कामे झाली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी चाऱ्या व खड्ड्यांमध्ये थांबावे यासाठी ग्रामस्थ खोदकाम करीत आहेत. ग्रामस्थांना डोंगरदºयांध्ये खोदकाम करण्याचे महत्त्व पटले आहे. प्रत्येकजण खोदकामात उत्स्फूर्त सहभाग देत आहे. यावेळी तालुका कृ षी अधिकारी राजेंद्र साळुंके, पर्यवेक्षक बी.व्ही. कांबळे, एम.ए. मोरे, एम.एस. डमाळे, एस.एम. पाखरे, व्हलगडे, जवरे, नांदगाव कृषी अधिकारी एस.एस. वईकर, डोखे, खैरनार, नाईक , जाधव, नागरे, कुरेशी, सरपंच मनीषा काळे, ग्रामसेवक विशाल सोनवणे, समाधान कदम, विजय काळे, नवनाथ काळे उपस्थित होते. यात आमदार डॉ. राहुल अहेर, दिनेश देवरे, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, प्रांत सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, बाळासाहेब वाघ, विलास ढोमसे, मनोज शिंदे, अमोल नेमनार, तालुका कृषी अधिकारी साळुंके, विजय पवार, अभिजित घुमरे व ग्रामस्थ, जलमित्र यांचा समावेश होता.
वॉटरकप स्पर्धा : नन्हावे, गोहरण, रेडगाव आदी गावांमध्ये ग्रामस्थांचा हिरिरीने सहभाग चांदवड तालुक्यात विविध गावांमध्ये श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:18 AM