लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना पाणी उपलब्ध होते. पालखेड कालव्यास शेतीसाठी दोन आवर्तन मिळाल्याने अनेक शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून टरबूजचे उत्पादन घेतले. सध्या टरबूज काढणीचा हंगाम सुरू आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने वाहतूकव्यवस्था ठप्प झाली आहे. टरबूज हा माल नाशवंत असल्यामुळे साठवून ठेवता येत नाही. येत्या आठ-दहा दिवसात टरबूज विक्र ी न झाल्यास टरबूज उत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा ऐन हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. त्यामुळे शेतकºयांना कर्जबाजारी व्हावे लागले. या पावसाने कांदा रोपे सडून गेल्याने व नंतर दोन-तीन वेळेस बियाणे टाकूनही धुके, दव तसेच हवामानातील बदलामुळे रोपे खराब झाल्याने अनेक शेतकºयांनी कांदा लागवडीचा नाद सोडून पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला व टरबूज उत्पादन घेतले. त्यासाठी लाखो रु पयांचा खर्च केला, मात्र ऐन काढणीच्या वेळेसच कोरोना या जीवघेण्या आजाराने हाहाकार माजवल्याने सर्वत्र संचारबंदी व लॉकडाउन सुरू असल्याने दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे उत्पादित झालेला माल शेतात कुजून चालला असल्याने शेतकºयांना लाखोरु पयांचा फटका बसला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात अवकाळी का होईना, पण समाधानकारक पाऊस झाल्याने मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतात पारंपरिक पिकांना फाटा देत सुमारे एक लाख रु पयापर्यंत खर्च करून दोन एकर टरबूज उत्पादन घेतले; मात्र सध्या लॉकडाउन व संचारबंदी असल्याने गावोगावी टरबूज विक्र ीसाठी फिरूनही खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.- निखिल दुघडटरबूज उत्पादक, देशमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळले असले तरी शेतकºयांना रोज उत्पन्न मिळवून देणाºया फळे व भाजीपाला या पिकांना ग्राहकच नसल्याने शेतकºयांना आपला माल रस्त्याच्या कडेला फेकून द्यावा लागत असल्याने लाखो रु पयांचा फटका सहन करावा लागत आहे.महागड्या औषधांचाखर्च वायाटरबूज लागवडीनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. दिवसभर कडक ऊन, रात्री गारवा व पहाटेच्या सुमारास थंडी, धुके व दव पडत असल्याने पिकाची वाढ खुंटली होती. अनेक शेतकºयांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने टरबूज लागवड केली. त्यामुळे रोजच्या रोज परिस्थितीनुसार पिकावर महागडी औषधांची फवारणी करावी लागल्याने हजारो रु पयांचा वाढीव खर्च करावा लागला. कोरोनाच्या संकटाने शेतकरी वर्गाने केलेला खर्च वाया गेला आहे.
येवल्यात टरबूज शेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:53 PM
पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : ग्राहक, व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठ; लाखो रु पयांचा खर्च पाण्यात