येवला : तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरीका ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रासंगिक कोट्यातुन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानेन्वये संपूर्ण बंधारे पाण्याने भरु न देण्यात आले. या जलसाठ्याचे पूजन सरला बेटाचे मठाधिपती संत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. रब्बी हंगामाच्या कालखंडातच भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा डमाळे बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे पाण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुसरु न जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वितरीका ४५ च्या वरील शेतकºयांचे सिंचनाचे हक्काचे असल्यामुळे प्रथम त्यांना पाणी देण्याचे आदेश केले व त्यानंतर प्रासंगिक पाण्याच्या कोट्यातुन वितरीका ४६ ते ५२ वरील बंधारे भरु न देण्याच्या आदेशानुसार ऐन उन्हाळ्यात मार्च महिन्यात संबंधित बंधारे भरु न देण्यात आले. कारण, अशा प्रकारचे उन्हाळ्यात बंधारे भरु न देण्यात प्रथमच यश मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात वर्गात आनंदाला पारा उरलेला नाही. यावेळी रामु भागवत, अरु ण देवरे, ठकचंद वरे, बाळासाहेब काळे, आप्पासाहेब भागवत, नाना शेळके, रावसाहेब मगर, शंकरराव सोनवणे, गजानन देशमुख, अण्णा ढोले, जगदिश गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकºयांच्या शिष्टमंडळाने महाजन व संबधित अधिकाºयांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. याप्रसंगी रामुदादा भागवत, बाळासाहेब काळे, अरु ण देवरे, नाना शेळके, ठकचंद वरे, कचरु चव्हाण, रावसाहेब मगर, सरपंच वेणुनाथ भागवत, संजय भागवत, अविनाश भागवत, आप्पासाहेब भागवत, हरिभाऊ साळुंके, संदिप भागवत, चांगदेव भागवत, कारभारी भागवत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखेड वितरिकेवरील जलसाठ्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:51 PM