वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या कामाला शुभारंभ करण्यात आला.राज्यभरात ८ एप्रिलपासून ‘सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धे’च्या कामांना प्रारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वडझिरेच्या ग्रामस्थांनी ७ तारखेच्या मध्यरात्री व ८ तारखेच्या पूर्वसंध्येला माजी उपसरपंच रामदास बोडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास प्रारंभ करण्यात आला. पानी फाउण्डेशनच्या घोषणा देत येथील खंडेराव टेकडीच्या पायथ्याशी गावातील ५० ग्रामस्थ व महिलांनी श्रमदानास सुरुवात केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, विलास बोडके, विठ्ठल भाबड, अशोक बोडके, रामनाथ बोडके, गंगा बोडके, सोमनाथ बोडके, आप्पा दराडे, अनिल बोडके, देवराम ठोंबरे, ताई बोडके, शोभा बोडके, छाया नागरे, रेखा बोडके, देवीदास कुटे, संदीप आंबेकर यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदानात भाग घेतला.गेल्या वर्षी ४५ दिवस काम करून वडझिरेकरांनी वॉटरकप स्पर्धेतील तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले होते. यावर्षी कामाचा अनुभव असल्याने राज्यात नंबर पटकाविण्याच्या इराद्याने ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. पानी फाउण्डेशनच्या कामात वेगळे काम करून राज्यात ठसा उमटविण्याचा निर्धार वडझिरेच्या ग्रामस्थांनी केला आहे.
वडझिरेत वॉटरकपच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:13 PM
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या कामाला शुभारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देपानी फाउण्डेशन : परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साह