कसबे सुकेणे : वारकऱ्यांना संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या भेटीची ओढ लागली असून, जिल्ह्यातून त्र्यंबकच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर शेकडो वारकरी भक्तीचा गजर मार्गक्रमणा करत आहे. ‘सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी’ याप्रमाणे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दर्शनाने कृतार्थ होण्यासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून शेकडो दिंड्या टाळ, मृदंगाच्या गजरात, तुळशीकलश आणि भगवी पताका घेऊन मजल दरमजल करत नाशिकमध्ये दाखल होत आहेत.रविवारी मालेगाव, धुळे, जळगाव, चाळीसगाव, नांदगाव या भागातील दिंड्या पिंपळगाव, ओझर, आडगावपर्यंत पोहोचल्या होत्या. उर्वरित जिल्ह्यातील व नाशिक-जवळील तालुक्यांतील दिंड्यांचेही रविवारी व सोमवारी त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले. भजन, कीर्तनाच्या गजराने जिल्ह्यातून नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणारे सर्व मार्ग फुलून गेले आहेत. ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत होत असून, रविवारअखेर नाशिकमध्ये तीस ते चाळीस दिंड्यांचे आगमन झाले होते. (वार्ताहर)
वारकऱ्यांना लागली निवृत्तिनाथांची ओढ
By admin | Published: February 01, 2016 10:27 PM