लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर मंगळवारी (दि.१०) भरपावसात तालुक्यातील वावीहर्ष येथील महिलांना हंडा मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.
४० लक्ष रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना पाच वर्षांपूर्वी कार्यान्वित करूनही सतत काही ना काही कारणाने ती बंद असते. आणि याच कारणावरून मंगळवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर हा मोर्चा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आला होता.
वावीहर्ष येथील महिला आपले रिकामे हांडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आल्या होत्या. जवळ पास ४० लाख रुपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत अनेक वेळा ग्रामसेवकांना सांगूनदेखील काहीच उपयोग झाला नाही. म्हणून श्रमजीवी संघटनेच्या महिलांनी आंदोलन केले आहे.
वैतरणा धरणाच्या कडेला असलेले वावीहर्ष गाव असून, या ठिकाणी दोन हजार लोक वस्ती आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करून मागील पाच वर्षांत नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. जून महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने पाणीपुरवठा बंद असतो. आता दोन महिने झाले आहेत, पाणी बंद आहे.
याबाबत अनेक वेळा ग्रामसेवकांकडे पाणीपुरवठा सुरळीत करावा म्हणून मागणी केली, मात्र त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. म्हणून मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या सर्व महिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या रिकाम्या हंडा मोर्चात अंजना बांगारे, लीलाबाई झुगरे, मंगला बागारे, सुरेखा मधे, मंजुळा लोभी, मंजुळा बंगारे, अनिता बांगरे, काशीबाई रेरे, चांगुणाबाई बांगारे आदी महिला सामील झाल्या होत्या. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव यांना सर्व महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. (१० त्र्यंबक, १)
100821\10nsk_33_10082021_13.jpg~100821\10nsk_34_10082021_13.jpg
वावीहर्ष येथील महिलांना हंडा मोर्चा~पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर मोर्चा काढला.