चौकट-
आपल्याला त्रास होत आहे हे लक्षात आल्यानंतर रुग्णाने लगेच डॉक्टरांना दाखविले आणि नियमीत औषधे घेतली तर त्या रुग्णाचा स्कोर वाढत नाही. यामुळे या गोळ्या अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत.
कोट -
शहरातील बहुसंख्य डॉक्टर या गोळ्यांची शिफारस करतात यामुळे या गोळ्यांना सर्वत्र मागणी आहे. पुर्वी या गोळ्या मुबलक मिळत होत्या पण सध्या त्यांची टंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दोन तीन दिवस सारखा पाठपुरावा केल्यानंतर १० ते २० स्ट्रीप मिळतात. -धनंजय खाडगीर, जिल्हाध्यक्ष रिटेल केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, नाशिक
कोट-
ॲडमिट झालेल्या रुग्णाला जसे रेमेडीसिविर इंजेक्शन प्रभावी ठरते तसेच होम कॉरंटाईन रुग्णांसाठी फैबिफ्लु ही गोळी प्रभावी ठरते फुफुसांमध्ये झालेले इन्फेक्शन कमी करण्यास ही गोळी प्रभावी ठरते. म्हणून अनेक डॉक्टर या गोळीची शिफारस करतात. - डॉ. चंद्रकांत शेवाळे, नाशिक