नाशिक : घंटागाडी प्रकल्पाकरिता पाच वर्षांसाठी नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यासंबंधी महासभेने केलेल्या ठरावाला आमदार देवयानी फरांदे यांचे हरकत घेणारे पत्र शासनाने निकाली काढल्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, शासनाने निविदा प्रक्रियेतील अडसर दूर करता सभाबाह्य कामकाजाबद्दल महापालिकेचे कान उपटले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मनपा आयुक्तांनी सुमारे ३०० कोटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव महासभेवर पुन्हा एकदा ठेवला होता. महासभेत सदर प्रस्तावाला कडाडून विरोध होऊनही महापौरांनी त्यास मंजुरी दिली होती. महापौरांच्या या निर्णयाला त्यावेळी शिवसेनेने हरकत घेत मतदानाची मागणी केली होती. परंतु महापौरांनी मतदानाची मागणी फेटाळून लावत सभा आटोपती घेतली होती.
घंटागाडीच्या निविदेचा मार्ग सुकर
By admin | Published: January 15, 2016 12:32 AM