प्रवीण दोशीवणी : एकेकाळी शंभर टक्के भात उत्पादनामुळे ‘भातोडा’ हे नाव धारण करणाऱ्या भातोडा गावाचा लौकीक आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कमी लागवड क्षेत्र आणि नगदी पिके घेण्याचा कल यामुळे भातोड्यातील भात उत्पादनात घट झाली आहे. क्षेत्रात घट झाली असली तरी काही शेतकरी कुटुंबाकडून मात्र भात उत्पादनाचा पारंपारिक वारसा जपला जाताना दिसून येत आहे.सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भातोडा गावाची लोकसंख्या अवघी २१०० आहे. भाताची शेती हा येथील परंपरागत व्यवसाय. परिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे. त्यावेळी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधून, विहिरीतील पाणी मोटेद्वारे काढुन तर ब-याच अंशी पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असे. संपूर्णत: नैसर्गिक पदध्तीने शेणखत टाकुन भात उत्पादित केला जायचा. लावणी, निंदणी, कापणी, मळणी, पात धरणे, पेंढ्या बांधून झटकणे, रचणे व वाळविणे अशा प्रक्रियेत १२० दिवसांचा कालावधी जायचा. त्यावेळी कुटुंबातील महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने करून भात उत्पादन वाढविण्यासाठी अग्रभागी राहायचा. भातवाळवणीनंतर बैलगाडयांमधून वाहतुक करून गरजेनुसार हॉलर मिलमधून भात काढुन तांदुळ विक्र ीतून उदरिनर्वाह व्हायचा. विशेष म्हणजे भातोड्याचा तांदुळ पंचक्र ोशीत प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे ग्राहक खास भातोडा येथे खरेदीसाठी यायचे. मात्र, कालौघात १९९५ च्या नंतर शेतकरी द्राक्ष, टमाटा, भाजीपाला या नगदी पिकांसह दुग्ध व्यवसायाकडे वळाले. हळूहळू क्षेत्र कमी होऊन भाताच्या उत्पादनात घट होत गेली. मात्र, भातोडे गावाचा भात उत्पादनाचा हा वारसा आजही काही कुटुंब जोपासताना दिसून येतात. सध्यस्थितीत १०० एकर क्षेत्रात इंद्रायणी दप्तरी, कोळपी, बासमती, आर 24, पार्वती, रत्नागिरी, पेरभात अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.या वर्षी मोठ्या प्रमाणावर पिक भातोडागावात भातक्षेत्र घटले असले तरी दर्जेदार भात उत्पादनाचा नावलौकीक कायम आहे. दरम्यान या वर्षी भात पिकाची पश्चिम पट्यात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. अतिवृष्टीचा फटका इतर पिकांच्या तुलनेत भाताला कमी बसला तसेच भरपूर पाणी मिळाल्याने भाताचे पिक या वर्षी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.- नीलेश गायकवाड, शेतकरी, करंजाळी
भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 4:23 PM
भातक्षेत्रात घट : काही शेतकरी कुटुंबाकडून वारसा जतन
ठळक मुद्देपरिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे