ठळक मुद्देएकही कोरोना नविन रूग्णाची नोंद नाही
पेठ : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतांना पेठ तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मंगळवारी (दि.८) सायंकाळी ७ वाजेच्या अहवालानुसार तालुक्यात एकही नवीन कोरोना बाधीत रूग्णाची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ७ रूग्ण उपचार घेत असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी सांगितले.