नाशिक : डोक्यावर बॅँकेचे अडीच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे घडली आहे.या घटनेने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या ११ झाली आहे. राजेंद्र यशवंत बोरसे (५०) असे या शेतकºयाचे नाव असून, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. मयत राजेंद्र बोरसे यांच्या आईच्या नावे वजीरखेडे शिवारात १ हेक्टर ५२ आर इतके क्षेत्र असून, स्टेट बॅँकेच्या शाखेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकत असतानाही शेतकºयांचे दृष्टचक्र संपुष्टात आले नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात चालू वर्षी आजवर ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
वजीरखेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:39 AM