नाशिक : जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बंद पडलेले सर्व रोहित्र बदलण्यासाठी प्रसंगी आम्ही आमचा निधी देऊ, पण तुम्ही शेतकºयांना तत्काळ रोहित्र बदलून द्या अशा सूचना जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना केल्या. बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही अधिकाºयांनी तत्काळ प्रस्ताव दिल्यास त्यांना शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बैठकीत विजेच्या प्रश्नावर जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपणीची रोहित्र बंद आहेत. रोहित्र बदलून देण्यास अधिकाºयांकडून टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकºयांची गैरसोय होते. अनेकवेळा शेतकरी स्वत:च पुढाकार घेऊन रोहित्र दुरुस्त करून घेतात. अशा विविध तक्रारी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ आदींनी केल्या. जिल्ह्णात एकूण किती रोहित्र बंद पडली आहेत. ती सर्व बदलविण्यासाठी किती निधी लागेल? असे प्रश्न भुजबळ यांनी अधिकाºयांना विचारले, मात्र वीज वितरणच्या अधिकाºयांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.आमदार काय म्हणाले..४रोहित्रांच्या प्रकरणात फायदा असल्याने अधिकारी त्यासाठी महिना महिना वाट पाहायला लावतात - नितीन पवार४रोहित्र जळाल्यास मालेगावी पॉवरलूक कारखाने अनेक दिवस बंद राहतात. त्याचा मजुरांना फटका बसतो. - मौलाना मुफ्ती मोहमद४जळालेले रोहित्र २४ तासात बदलून द्यावे, असा नियम असताना शेतकºयांना ते महिना महिना मिळत नाही. - माणिकराव कोकाटे४नवीन रोहित्र घेण्यासाठी निधी नसेल तर प्रसंगी आमदारांचा निधी वापरावा - हिरामण खोसकरमाजी पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका४जिल्ह्यातील विकास निधीवर २०-२५ टक्के खर्च होणे बाकी राहिल्यास आम्ही त्याकाळी प्रशासनाला जाब विचारत होतो. आता तर केवळ २० टक्के निधी खर्च होऊन ८० टक्के निधी पडून राहत असतानाही तेव्हा लोकप्रतिनिधीही काहीच कसे बोलले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित करीत मागील शासनाच्या कार्यकाळातील लोकप्रनिधी आणि पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. नाशिकमधील २० हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाविषयी भुजबळ यांना विचारले असता याविषयीची पूर्ण माहिती आपल्याकडे आली नसून याची माहिती घेतली जाईल असे सांगून ‘सारे आभाळच फाटलंय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.ई-गव्हर्नस काय कामाचे४शासकीय कामात गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नस प्रणाली कार्यरत असताना अधिकारी या सुविधांचा वापर करीत नाहीत का, असा सवाल पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थितीत केला. अधिकाºयांच्या हातात ई-मेल, व्हॉट्््सअॅपसारखे माध्यमे असताना कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संबंधित अधिकारी, विभागाला संदेश पाठवून कामांची आठवण करून देण्यास काय हरकत आहे. अधिकाºयांच्या अशा निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याचे अपयश समोर आले असल्याची हतबलता भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान येत्या २८ रोजी आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली जाईल, असे जाहीर केले.भुजबळांनी जोडले हातआदिवासी उपायोजनेतील कामांच्या खर्चाचा तपशील का सादर केला नाही, अशी विचारणा जिल्हा परिषदेच्या एका अभियंत्यांना विचारला असता त्यांना खर्चाच्या तपशिलाविषयी काहीच सांगता आले नाही. वारंवार विचारणा करूनही मूळ मुद्दा सोडून ते माहिती देऊ लागल्याने अखेर पालकमंत्री छगन भुजबळांवर ‘हात जोडून विनंती करतो, कामे करा’ असे हताशपणे म्हणण्याची वेळ आली.
आम्ही पैसे देतो, तुम्ही शेतकऱ्यांना रोहित्र द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:26 AM
जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बंद पडलेले सर्व रोहित्र बदलण्यासाठी प्रसंगी आम्ही आमचा निधी देऊ, पण तुम्ही शेतकºयांना तत्काळ रोहित्र बदलून द्या अशा सूचना जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना केल्या.
ठळक मुद्देआमदारांचा सूर । नियोजन बैठकीत विजेच्या प्रश्नावर जोरदार चर्चा