शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

नाशकात घाऊक किराणा व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:49 AM

भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरात शुक्रवारी (दि. २८) व्यापार बंद आंदोलन केले. या आंदोलनात घाऊक किराणा व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठेतील जवळपास २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

नाशिक : भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरात शुक्रवारी (दि. २८) व्यापार बंद आंदोलन केले. या आंदोलनात घाऊक किराणा व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठेतील जवळपास २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. मात्र, मेनरोड, एमजीरोड परिसरातील कटलरी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, पादत्राणे, कापड विक्रेत्यांनी मोर्चानंतर दुकाने उघडली. त्यामुळे किराणा व्यावसाय वगळता शहरातील व्यापाºयांना भारत बंदमध्ये संमिश्र सहभाग नोंदविल्याचे दिसून आले  देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देणाºया तसेच लाखोंची रोजगारनिर्मिती करणारे किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीचा थेट फटका व्यापा-यांना बसणार  आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील थेट परकीय गुंतवणुकीसह  रिटेल व होलसेल मॉलला विरोध करण्यासाठी नाशिकमधील व्यापाºयांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. व्यापाºयांनी सकाळी १० वाजता रविवार कारंजा येथेएकत्र येत चांदीच्या गणपतीची  आरती करून रविवार कारंजा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.  या आंदोलनात महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात नाशिक घाऊ क किराणा व्यापारी  संघटना, किरकोळ किराणा व्यापारी संघटना, नाशिक मोटार मर्चंट संघटना, हार्डवेअर मर्चंट संघटना, प्लायवूड मर्चंट, नाशिक मोटार मर्चंटसह इतर व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.२४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्पजिल्ह्यात किराणा आणि धान्याचे जवळपास अडीच हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. तर शहरात सुमारे पाचशे घाऊक व्यापारी आहेत. या सर्व व्यापाºयांसह सकाळच्या सुमारास बंदमुळे अन्य व्यावसायिकांनीही त्यांची दुकाने बंद ठेवल्याने शहरातील सुमारे २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचरसह इतर छोट्या-मोठ्या व्यापाºयांची अशी एकूण ५ ते ६ कोटी रु पयांची उलाढाल ठप्प झाली, तर घाऊक किराणा व्यवसायात सर्वाधिक १२ ते १३ कोटी रुपयांच्या उलाढालीला ब्रेक लागला. किरकोळ व्यवसायात ४ ते ५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, नाशिक सराफ संघटनेने या बंदला पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्या व्यापाºयांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. मात्र, सराफी पेढ्यांचे व्यवहार नियमित सुरू होते. तर कापड विक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केल्याचे दिसून आले.जगभरात मॉल संस्कृतीमुळे किरकोळ व्यापार धोक्यात आल्याने मंदीचे सावट असताना भारतातही परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून किरकोळ आणि घाऊक व्यापारात मॉल संस्कृतीची सुरुवात होऊ लागली आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे मॉल संस्कृती वाढू लागल्यामुळे घाऊक व्यापाºयांसोबतच किरकोळ किक्रेत्यांच्या चिंतेत भर पडली असून, त्यांच्या व्यवसायावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे धान्य, प्लायवूड तसेच विविध किरकोळ विक्रेत्यांनी शुक्रवारी देशभरात बंद पाळला. नाशिकमध्ये या बंदला किराणा व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजार