नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.७) पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई येथील वेधशाळेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गरज भासल्यास नाशिककरांनी घराबाहेर पडावे. नदीपात्रालगत जाऊ नये. नदीकाठावरील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून केले जात आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून कुठल्याहीप्रकारे विसर्ग करण्यात आलेला नसला तरीदेखील गोदापात्रातील दुतोंड्या मारूतीची मुर्ती गुडघ्यपर्यंत पाण्यात बुडाली असून गोदापात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून मागील २४ तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. रविवारी पहाटे साडेपाच वाजेपासून सकाळी साडे आठवाजेपर्यंत शहरात ३२.८ मि.मीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७०.५ मि.मी पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान केंद्राने दिली
हवामान खात्याचा इशारा : नाशिकमध्ये रात्रीपर्यंत ‘जोर’धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 3:34 PM
नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.७) पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई येथील वेधशाळेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ...
ठळक मुद्देमागील २४ तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला सकाळी साडे आठवाजेपर्यंत शहरात ३२.८ मि.मीपर्यंत पाऊस