येवला : भारत सरकार वस्त्र मंत्रालय आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने येवला शहर व तालुक्यातील पैठणी विणकरांसाठी नागडे येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात हस्तकला सहयोग शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयातील सहायक संचालक आर. एस. परमार, येवला विधानसभा विस्तारक अण्णासाहेब सावंत, राष्ट्रस्तरीय मुक्त विद्यालयाचे विभागीय संचालक अशोक कुमार, राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे संचालक उपेंद्र बहिरे, संत कबीर पुरस्कार विजेते शांतिलाल भांडगे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमेशसिंग परदेशी यांच्यासह येवला बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक सोमासे, उद्योजक बाळासाहेब कापसे, भाजपा कार्यकारिणी सदस्य गोरख खैरनार, भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी उपस्थित होते. सहायक संचालक वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आर. एम. परमार यांनी प्रास्ताविक केले. पैठणीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी रेशमाची रंगनी, आणि सफाई व कलात्मक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत परमार यांनी व्यक्त केले. पैठणी राज्य व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शांतीलाल भांडगे, रमेशसिंग परदेशी यांच्यासह दुर्गा माहूलकर प्रणीता परदेशी, कृष्णकांत दिवटे, विनोद जाधव, अण्णा अभंग, केशव धिवर, साहेबराव पगारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विणकर सेवा केंद्र मुंबईच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि नॅशनल ओपन स्कूल येथील विणकर अभ्यासक्रमासाठी पंजीकरण करण्याबाबत माहिती देण्यात आली. कुशल विणकरांसाठी हातमाग आणि इतर साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान हे नोंदणीकृत विणकरांना देणार असल्याने विणकरांनी तत्काळ नोंदणी करावी. तसेच काही समस्या असल्यास विणकर सेवा केंद्राशी संपर्कसाधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागडे येथे विणकरांसाठी सहयोग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:09 AM