नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुरुवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता शालेय 'ग्रंथालय वास्तव व भवितव्य' विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुमार यांचे व्याख्यान होणार आहे.डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी वाचन प्रेरणा साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे वाचन दिनाचा सामूहिक कार्यक्रम शक्य नसल्याने या वेबिणारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये झूमच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. तर ज्या वाचकांना लिंक उपलब्ध होऊ शकणार नाही, त्यांना युट्युबवरही वेबिनारचा आस्वाद घेता येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष विलास सोनार, उपाध्यक्ष विनोद भंगाळे, कार्याध्यक्ष शंकर घोरपडे व कार्यवाह जगदीश चित्ते यांनी दिली.