शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बुधवारपासून पहायला मिळणार अधिकमासाची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:29 AM

दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे.

नाशिक : दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे.  सासरी असणाऱ्या लेक-जावयास बोलावून त्यांना अनारसे, बत्तासे, आंबे, इच्छेनुसार पैसे, सोने-चांदी, तांब्या-पितळाची भांडी, कपडे, उपकरणे आदी देऊन अधिकमासाचे पुण्य मिळवण्यावर भर दिला जातो. यामुळे तुळशीच्या लग्नानंतर सुरू झालेली लग्नसराई संपताच नव्या जावयांबरोबरच जुन्या जावयांनाही गमतीने ‘अच्छे दिवस’ येणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (दि.१५) अमावस्या संपल्यानंतर अधिकमास सुरू होणार आहे.  नोकरी धंद्यासह आपापल्या व्यापात मग्न असणाºया जावयांना आता सासूरवाडीच्या निमंत्रणाची आस लागली आहे. सध्या उन्हाचा कडाका पहायला मिळतो आहे. शहर व ग्रामीण भागात सुट्या, प्रवास, लग्नकार्य, शेताची कामे अशा अनेक गोष्टींचा एकाचवेळी ताण पहायला मिळत आहे. त्यात आता अधिकमासाची भर पडणार आहे. हा अधिक महिना फलदायी मानला जात असल्याने या काळात तीर्थस्थळावर दीपदान, पूजा, अर्चा, ब्राह्मणपूजा, दानधर्म, धार्मिक उपक्रम यांनाही महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अधिकमासास लागणाºया वस्तू, पदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे, तर घरोघरी लेक, जावयाला, भाच्यांना काय भेट द्यायची यावर चर्चा ऐकायला मिळत आहे. सोने-चांदीच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट््स याबरोबरच गृहोपयोगी वस्तू देण्याचेही नियोजन करताना दिसत आहे. याशिवाय अधिकमासात लेक जावयाला, त्याच्या कुटुंबीयांना बोलावून गोडाधोडाचे जेवणही दिले जाते.अधिकमास म्हणजे काय?ऋतू सौरमासाप्रमाणे ठरलेले असतात. चांद्रवर्षाचे ३५४, तर सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजे या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे तसेच चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ बसावा म्हणून एक महिना अधिक धरावा, असे सांगितले जाते. याला पुरुषोत्तम मास, मलमास असेही म्हटले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यास इच्छित फळ प्राप्त होत असल्याचीही आख्यायिका आहे. या महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला जातोे. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांना सन्मानपूर्वक बोलावून ३३ अनारसे दिले जातात. अनारसे नसतील, तर ३३ बत्तासे , ३३ म्हैसूरपाक वड्या, घिवर, ३३ नारळ, ३३ सुपाºया किंवा ३३ आंबे अथवा इतर कोणतेही ३३ फळे दिले तरी चालतात. चांदी किंवा तांब्याच्या ताटात दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना दिले जाते.

टॅग्स :Nashikनाशिक