खर्डे : येथे डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तणनाशक फवारणी करण्यात आली.पावसाळ्याचे दिवस असल्याने खर्डे गावात ठिकठिकाणी गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, विविध साथींचे आजार उद्भवण्याची भीती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात तणनाशक फवारणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी दिली.गावात असलेल्या मोकळ्या जागांवर गाजरगवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात तणनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
खर्डे ग्रामपंचायतीकडून तणनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:03 AM