शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

प्रेमाच्या सप्ताहात गुलाबाने घेतला ‘भाव’; खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 7:04 PM

तुकाराम रोकडे देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. व्हॅलेंटाइन वीकच्या पार्श्वभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने तरुणाईच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्दे दरात दुपटीने वाढ : तरुणाईत उत्साह, बाजारपेठा सजल्या

व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला यंदा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रोझ डेलाच झळ बसली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्यामुळे, गुलाबाच्या एका फुलासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरुणांमध्ये उत्सुकता असते, ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डेची. काही लोक आपल्या पार्टनरला फूल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कुणी पार्टनरला रोमँटिक डेटला घेऊन जाते. ह्यरोझ डेह्णपासून व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होते. या दिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजले जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची नाजूक भावना व्यक्त करण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. यंदा मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फुलांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० रुपये एका गुलाबाच्या फुलासाठी मोजावे लागत आहेत. त्यातच आता व्हॅलेंटाइन वीकमध्ये गुलाबाच्या फुलांची मागणी लक्षात घेता, हे भाव २० ते २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांसह फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रेमाच्या या उत्सवात फूल व्यवसायाला उभारी मिळण्याचे चित्र दिसून येत आहे. व्हॅलेंटाइन वीकचा पहिला मान प्रेमाचा सुंगध परविणाऱ्या गुलाबाला आहे. यासाठी फुलांची बाजारपेठ सजली आहे. मात्र, गुलाब खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. गत आठवड्यात १० रुपये प्रति नगाने विक्री होत असलेल्या गुलाबाचे दर दुपटीने वाढून २० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेले दर हे २० फेब्रुवारीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे एका फूल विक्रेत्याने सांगितले.अतिवृष्टीचा फुलशेतीला फटकावातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांचा परिणाम यंदा फुलांच्या उत्पादनावर झाला आहे, तसेच जानेवारीमध्ये झालेल्या अतिवृष्टीचाही फुलशेतीला फटका बसला आहे. गुलाबाच्या फुलांच्या उत्पादनाचा विचार केल्यास यंदा त्यामध्ये जवळपास ३० टक्के घट झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकValentine Weekव्हॅलेंटाईन वीक