नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर सवलतींच्या योजनांचे महाडीबीटी पोर्टल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संथगतीने चालत आहे. त्यामुळे या विविध योजनांच्या लाभास पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.अनेक विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत आतापर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करता आलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार असून, शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यास आता केवळ आठवडाभराचा कालावधी उरला आहे. शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांकडून प्रयत्न होत असल्याने संकेतस्थळावर संथ प्रतिसाद मिळत असल्याने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रि येत अडचणी येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत असल्याने संबंधित अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास केवळ आठवडाभराचा कालावधी उरल्याने पुन्हा सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. गेल्या महिनाभरापासून शिष्यवृत्तीच्या आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत संथ चालणाºया संकेतस्थळामुळे विलंब झाला आहे.अडचणींचा सामनागेल्या वर्षीही अशाप्रकारच्या संगणकीय गोंधळामुळे आॅनलाइन प्रणालीचा फज्जा उडाल्यामुळे गेल्या वर्षी अनेक विद्यार्थी अर्ज भरू न शकल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. आता नव्याने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अद्याप अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता आलेले नाहीत.
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:13 AM