आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलसमोरील समांतररोड, कोणार्कनगर, वृंदावननगर परिसरात आठवडे बाजारामुळे कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. आठवडे बाजार आटोपल्यानंतर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय डासांचे प्रमाणदेखील वाढत आहे. या समस्येकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.जत्रा हॉटेलसमोरील परिसरात दर गुरु वारी कोणार्कनगरमध्ये तर वृंदावननगरमध्ये मंगळवारी व शुक्र वारी आठवडे बाजार भरतो. बाजार थेट समांतर रोडपासून कॉलनी रोडवर भरतो पण बाजार आटोपल्यानंतर स्टेट बँक, कॉलनीरोड, बहिणाबाई महाविद्यालयापर्यंत तर कोणार्कनगर व वृंदावननगरमध्ये मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग ठिकठिकाणी दिसून येतात. कचरा तत्काळ उचलला जात नाही त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते. सध्या पावसाची रिपरिप सुरू असून, साचलेल्या कचºयावर पाणी साचल्यामुळे कुजून दुर्गंधी पसरते त्यामुळे बाजार आटोपल्यानंतर तत्काळ स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.याशिवाय आठवडे बाजार रस्त्यावरच भरत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय रस्त्यावर होणाºया बेशिस्त पार्किंगमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते त्यामुळे आठवडे बाजारासाठी प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून योग्य त्या सोयीसुविधा पुरवाव्या जेणेकरून अस्वच्छता, वाहनकोंडीची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावीकोणार्कनगर, जत्रा हॉटेल परिसरात मंगळवारी, गुरु वारी, शुक्र वारी या दिवशी आठवडे बाजार भरतो. याशिवाय हनुमाननगर, चक्र धरनगर, हिरावाडी या परिसरासह आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी रोज आठवडे बाजार भरतो. बाजार आटोपल्यानंतर तत्काळ स्वच्छता करण्यासाठी व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. बाजार थेट समांतर रोडपासून कॉलनी रोडवर भरतो पण बाजार आटोपल्यानंतर स्टेट बँक, कॉलनीरोड, बहिणाबाई महाविद्यालयापर्यंत तर कोणार्कनगर व वृंदावननगरमध्ये कचºयाचे ढीग ठिकठिकाणी दिसून येतात.
आठवडे बाजारांतील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 1:15 AM