नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.येत्या शुक्रवारपासून (दि. १) या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बाजार भरविला जाणार आहे. या बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात येणार नाही, तर शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी दाखल होणार असल्याचा दावा कृषी पणन मंडळाने केला आहे. कृषी पणन मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी थेट ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यासाठी मोफत जागा पांजरापोळ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. विक्रीसाठी येणाºया शेतकºयांकडून कुठल्याही प्रकारे जागेचे शुल्क अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नसल्याचे पांजरापोळ संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतमालाचे हाताळणी दरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. ग्राहकांना मिळणार दर्जेदार शेतमालशेतकरी थेट शेतमाल बांधावरून बाजारात विक्रीसाठी आणणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शेतमाल मिळणार आहे. या बाजारात थेट शेतकºयांमार्फत विक्री होणार असल्यामुळे नागरिकांना वाजवी दरात चांगला भाजीपाला, फळभाज्या उपलब्ध होणार आहेत. किरकोळ, घाऊक विक्रेते, आडतदार, मध्यस्थ नसल्यामुळे शेतमालाच्या किमतीही अव्वाच्या सव्वा राहणार नसल्याचे कृषी पणन मंडळाचे म्हणणे आहे.