मंगळवारी, शहरात तालुक्याचा आठवडे बाजार भरतो. सोमवारी, (दि. २२) प्रशासनाने शहरात विशेष मोहीम राबवून मास्क न वापरणार्यावर दंडात्मक कारवाई केली.
मंगळवारी (दि.२३) सकाळी नेहमी प्रमाणे आठवडे बाजारासाठी खेड्या-पाड्यातून शेतकरी तर शहरातील व्यापारी भाजीपाला-फळे घेवून दाखल झाली. मात्र, नगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात नियमित ठिकाणी भरणारा दैनंदिन बाजार उठवला तर आठवडे बाजाराच्या ठिकाणी माल विक्रीसाठी आलेल्या शेतकरी- व्यापार्यांनाही परत पाठवले. काही ठिकाणी पालिकेने ट्रॅक्टरमध्ये माल जप्त करून वाहूनही नेला.
बाजार समितीत भाजीपाला लिलाव होवून शहरातील अनेक व्यापार्यांनी बाजाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात माल भरला होता. मात्र, पालिका व पोलिस प्रशासनाने ऐनवेळी कारवाईचा बडगा उगारल्याने खेड्या-पाड्याहून आलेल्या शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गाचीही मोठी धावपळ उडाली. तर अनेक शेतकर्यांनी प्रशासनाच्या या मोहीमेवर तीव्र नाराजीही व्यक्त केली.
कोट....
बाजार बंदी बाबत नगरपालिका, महसूल वा पोलिस प्रशासनाने पूर्व कल्पना द्यायला हवी होती. कोणतीही सूचना न देता कारवाई करून ऐनवेळी बाजार बंद केल्या गेल्याने शेतकरी व व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.
- शिवाजी वाबळे, शेतकरी
फोटो- २३ येवला बाजार-१
===Photopath===
230221\23nsk_34_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ येवला बाजार-१