सुदर्शन सारडा ओझरयेथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असली तरी, हा बाजार मात्र सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. येथील रस्त्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने भाजीपाला विक्रेते व बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरला आहे.मुंबई - आग्रा महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ अर्ध्याहून अधिक जागेत विक्रेते बसतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. येथील महामार्ग ओलांडणारे नागरिकदेखील जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. महामार्गाचे अर्धवट कामदेखील याला जबाबदार आहे. ग्रामपंचायतीने मागच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारुती वेसपासून जरी वाहतूक बंद केली असली तरी बाणगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांवर आता विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अगदी थोड्याथोडक्या जागेत कसेबसे विक्रेते भाजीपाला विकण्यासाठी बसतात. आज ओझरचा सामान्य माणूस महामार्गावरील अपूर्ण कामामुळे त्रस्त आहे.चोरांचा सुळसुळाटबाजारात अनेक चोऱ्या होतात. आतापर्यंत हजारो मोबाइल, पाकीट चोरीला गेले असून, दोन -पाच हजारासाठी कुणी पोलीस स्टेशनमध्ये जात नाही कारण आजपर्यंत बाजारातून चोरी गेलेले सामान परत मिळालेले नाही. महिला आपल्या लहान चिमुकल्यांबरोबरदेखील भाजीपाला विकतात त्यात एखादीच तोल गेला तर सुमारे २० फूटहून अधिक खोल असलेल्या पात्रात पडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. जर कोणी पडलाच तर याला जबाबदार कोण हादेखील प्रश्न आहे. यात गटारगंगा झालेली बाणगंगादेखील येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करेल हे स्पष्ट आहे. कारण दररोज लाखो डासांची उत्पत्ती बाणगंगामधून होत असते. महामार्गावर तर पोलीसदेखील हतबल असून, गर्दीवर आणि वाहनांवर नियंत्रण मिळवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. मागच्याच ग्रामसभेत स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत देखील बाजार भरविण्याचा विचार झाला. येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमण्याची गरज आहे.
आठवडे बाजारतळ धोकेदायक
By admin | Published: October 26, 2016 11:14 PM