नाशिक : राष्ट्रीय विकास मंडळाच्या नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे सोमवारपासून सुरु असलेल्या सांस्कृतिक उत्सवात शनिवारी (दि.६) हिंदू नववर्ष तथा गुडीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर स्वागत यात्रेद्वारे नववर्षार्च जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या प्रारंभी प्रभू श्री रामचंद्रांच्या मंगलमय नामस्मरणाने सर्व स्वागत यात्रांचा प्रारंभ झाला. यात पंचवटी विभागातून गणेशवाडी व्यायामशाळेपासून प्रमुख पाहूणे प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या पुष्पा दीदी व अस्मिता दुधारे यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या यात्रोत्सवात कृष्णनगर मित्र मंडळातर्फे एकात्मतेचा संदेश देणाºया चित्र रथासह शुक्ल यजुवेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचा सण व परंपरेचे दर्शन घडविणाºया चित्ररथांनी लक्ष वेधून घेतले. तर रामवाडीतील कलावती आई मंदिरापासून प्रमुख पाहूणे रोशनी मुर्तडक व अजिंक्य वैद्य या क्रीडापटूंसह जेष्ठ चार्टडसनदी लेखापाल शिवाजी खांदवे यांच्या हस्ते गुढीपूजन करून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. काळाराम मंदिराच्या पुर्व दरवाजापासून आनंद वैशंपायन व नाशिक धनुर्विद्या संघटनेचे सचीव मंगला शिंदे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले.त्याचप्रमाणे सरदार चौक मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे चित्ररथांसह यात्रोत्सवात सहभाग घेण्यात आला. या नववर्ष स्वागत यात्रेत चित्र रथ, महिलां व पुरुषांचे ढोल पथक, लेझीम, लाठी-काठी पथक, विविध भजनी मंडळे, धार्मिक व सांस्कृतीक मंडळे तसेच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहणारा चित्ररथासह मतदार जनजागृती करणाºया चित्ररथांनीगी सहभाग घेतला होता. या स्वागत यात्रेत विनयकुमार चुंबळे यांची स्टार विनर 1974 ची मर्सिडीज् कारने नाशिकच्या सांस्कृतीक व धार्मिक प्रतिकांचे प्रदर्शन घडविले. नववर्ष स्वागत यात्र समितच्या माध्यमातून शहरातून काढण्यात आलेले सर्व सर्व यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, गोदाघाट येथे करण्यात आला. या सोबतच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संस्कृतीक महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
भद्रकालीतून विविध मंडळांचा सहभाग रविवारकारंजा विभागातून साक्षी गणपती, भद्रकाली कारंजा येथून सकाळी साडेसहा वाजता सुर्योदयाला इस्कॉनचे स्वामी शिक्षाष्टकम, कृष्णघनदास, हिंदु एकताचे रामसिंग बावरी, योग विद्याधामच्या पौर्णिमा मंडलीक यांच्या हस्ते गुढीपूजन करून लोकमान्य विद्यालयाच्या लेझीम पथकासह सहस्त्रनाद ढोल वादकांचा समुह यात्रोत्सव सुरू झाला. यात शिवाय योग विद्याधाम यांचा चित्ररथ व विठ्ठल माऊली भक्तमंडळ यांचा चित्र रथ, दत्त छंद परीवार यांचा चित्र रथ, भारतीय इतिहास संकलन समिती, वेलकम मित्र मंडळा, गजानन महाराज सेवा संस्थानचा राम रथ या यात्रोत्सवात सहभागी झाले होते. दरम्यान, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईन्ड तर्फे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शाम पाडेकर व रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुलींचे मल्लखाम प्रात्यक्षिके प्रशिक्षक यशवंत जाधव व लिना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली.
महिलांची बाईक रॅलीतून मतदार जागृतीनववर्ष स्वागत योत्रोत्सवात पारंपारिक अबाल वृद्धांनी पारंपारिक पोशाख परिधान रथयात्रांसोबत सहभाग घेतला. तर सुमारे अडीचशे महिलांनी बाईक रॅली काढून मतदार जागृती केली करीत बाईक रॅलित सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्यदो कराटेसह आत्मसंरक्षणार्थ उपयुक्त ठरणारे उपयुक्त ठरणाºया विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच कथ्थक, मंगळागौर, गरबा यासह गणेश वंदना व तराना नृत्याविष्कारांचेही सादरीकरण करण्यात आले.