सटाणा : गणपती बाप्पा मोरया , मंगल मूर्ती मोरया, बाप्पा आला रे, बापा आला रे च्या गजरात गणेशाचे घरोघरी आगमन झाल्याने शहरात प्रथमच पाच महिन्या नंतर बाजार पेठेत गर्दी व भक्तिमय वातावरण दिसून आले. आज सकाळपासून शहर व परिसरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात श्री चे आगमन झाले.
बाजार पेठेत पुजेच्या साहित्य व प्रसाद खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमनात गर्दी दिसून आली तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असल्याने शहरातील बाजारपेठ फु लली आहे. गणेशमुर्तींच्या खरेदीसाठी टिळकरोड, ताहाराबाद रोड, मल्हार रोड, शिवाजी रोड , बसस्थानक परिसर,दोधेश्?वर नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, साठ फु टी रोड येथेही गर्दी केली होती. मुर्तीबरोबरचे पुजेचे साहित्य, वस्त्र, फ ळे, विडयाचे पाने, नारळ, धुप, अगरबत्ती, याबरोबरच गणपती डेकोरेशन सजावट साठी लाईंटींग, विविधप्रकारच्या फु लांच्या माळा, मकर आदी साहित्य खरेदीसाठी गर्दी फु लली होती. तसेच सराफ बाजार देखील फु लला आहे. गणपतीच्या पुजेसाठी विविध प्रकारच्या चांदीच्या समया, ज्वासंदी हार, दुर्वा हार, निराजंन, पळी,पंचपत्री, घंटा ,ताम्हण, कुयरी, फु लपात्र,चांदीचे मोदक खरेदीसाठी गर्दी होती. अनेक घरात विद्यार्थ्यांनी घरातच पर्यावरणपुरक शाडू मातीच्या गणेशमुर्ती तयार केल्या आहेत. घरातील सदस्यांचा देखील हातभार विद्यार्थ्यांना लाभला आहे. श्री गणेशाच्या आगमानापाठोपाठ गौरींचीही प्राणप्रतिष्ठा मंगळवार दि. २५ रोजी होणार आहे. यामुळे दरवर्षाप्रमाणेच मुखवटंयाची रंगरंगोटी, कलाकुसर वस्त्रांची खरेदी, दागिने व गौरींसाठी आरास साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसुन येत आहे.