महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेतला असून क्रीडा विद्यापीठ लोगो बनविण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाचे अध्यापक भारतीने स्वागत केले असून, सरकारला अभिनंदनाचे पत्र पाठवल्याची माहिती शेजवळ यांनी दिली आहे. अध्यापक भारतीच्या वतीने राष्ट्रीय कला व क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याकरिता सन २००१ च्या आधीपासून सरकारकडे वेळोवेळी विनवणी करत निवेदन, आंदोलन, सत्याग्रह, सह्यांची मोहीम राबविली होती. शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केल्याने महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय बालक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण प्रशिक्षण संस्था, अध्यापक भारती व राष्ट्रीय कला- क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व अध्यापक भारती आंतरराष्ट्रीय कला विद्यापीठ व क्रीडा शाळा स्थापनेसाठी लढा उभारणार असल्याचे कला -क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियानाचे प्रवर्तक शेजवळ यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:15 AM