पायी दिंडीचे सिन्नर तालुक्यातील मेंढी, खडांगळी, वडांगळी, निमगाव या गावांमध्ये भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवपूर येथे शुक्रवारी दिंडी दाखल झाली. डोक्यावर तुळशीवृंदावन खांद्यावर भगव्या पताका टाळ-मृदंगाचा निनाद मुखात हरिनामाचा गजर करीत भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूर येथील गावात ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी रस्त्यावर सडा-रांगोळी काढुन दिंडीचे स्वागत करण्यात आले. या दिंडीत शेकडोच्या वर नांदूरमधमेश्वर येथील वारकरी सहभागी झाले आहेत. देवपूर येथील जनाबाई पांडुरंग गडाख यांच्या निवासस्थानी दिंडी आल्यानंतर ह. भ. प. रोहिदास महाराज इकडे यांचे प्रवचन झाले. यावेळी ज्ञानेश्वर गडाख, मधुकर गडाख, नितीन गडाख, अर्चना गडाख, सुवर्णरेखा गीते, समर्थ गीते, आरु ष गडाख, दिंडीचे स्वागत केले. या दिंडीमधील वारकरी माधव महाराज गाजरे, जयराम गाजरे, रामदास इकडे, केशव गाजरे, पंढरीनाथ भिसे आदी वारकरी उपस्थित होते.यावेळी श्रीकांत गडाख, सुखदेव गडाख, गोवर्धन रानडे, दिनेश गडाख, बाळासाहेब नरोडे, मुरलीधर नरोडे, विजय नरवडे, सुधीर गडाख, कचेश्वर गडाख, म्हाळु खोले , संदीप उगले यांनी वारकाऱ्यांचे स्वागत केले. दुपारी मध्यान्ह भोजनाचा लाभ घेऊन पायी दिंडी आळंदीकडे प्रस्थान झाले.
भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूरला स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:01 PM