देवगाव : शिरवाडे येथील भूमीपुत्र महान तपस्वी प.पु १०८ महंत सोमेश्वरानंद महाराज शिवटेकडी, बोयेगाव यांच्या जन्मभूमी शिरवाडे येथे आगमनानिमित्ताने भव्य स्वागत व सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्र मास प.पु १०८ महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज भांगशीमाता गड, प.पु १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, दिनेशगिरी महाराज सावकारवाडी, प.पु १०८ महंत लखनगिरी महाराज, महंत राघवेश्वरानंद महाराज उपस्थित होते.शिरवाडे येथे सुभद्राबाई पोमनर यांनी भूमीदान केली आहे, त्या जागेवर भव्य कुटिया तसेच विकास करण्यात आला आहे. तपसाधनेनंतर त्यांचे प्रथमच जन्मभूमी शिरवाडे येथे आगमन झाले. यावेळी उपस्थित संत महंतांची सवाद्य मिरवणूक,परमानंदिगरी महाराज, सोमेश्वरानंद महाराज यांचे प्रवचन, स्वागत समारंभ ,महाप्रसाद आदी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आल होते.(फोटो १४ सोमेश्वरानंद)तपसाधना पुर्ण.....सन १९७६ मध्ये सोमेश्वरानंद यांचा शिरवाडे येथे जन्म झाला. बालपण व प्राथमिक शिक्षण शिरवाडे येथे झाले. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराज हायस्कुल गुरुकुल वेरूळ येथे माध्यमिक व गो.म.पाटील विद्यालय जळगाव निंबायती येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. श्रीमहामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्या संपर्कात आल्यानंतर १६ जानेवारी २००१ रोजी अलाहाबाद प्रयाग येथे त्यांनी ब्रम्हचर्य स्वीकारले. त्यांनी ऐहिक सुखाचा त्याग करून बोयेगाव टेकडी येथे १८ जानवारीे २००३ साली तपसाधना सुरू केली. त्यांची १५ वर्षे ३ महिने तपसाधना ३१ मार्च २०१८ रोजी पूर्ण झाली.
महान तपस्वी सोमेश्वरानंद यांचा स्वागत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 5:29 PM
देवगाव : शिरवाडे येथील भूमीपुत्र महान तपस्वी प.पु १०८ महंत सोमेश्वरानंद महाराज शिवटेकडी, बोयेगाव यांच्या जन्मभूमी शिरवाडे येथे आगमनानिमित्ताने भव्य स्वागत व सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्दे१५ वर्षे ३ महिने तपसाधना ३१ मार्च २०१८ रोजी पूर्ण झाली.