नाशिक : जळगाव घरकुल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला. नाशिक शहरात हे वृत्त कळताच शहरातील टिळकवाडीतील जैन ओस्वाल बोर्डिंगच्या प्रांगणात जैन समाजबांधव एकत्र झाले व त्यांनी एकमेकांना पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले़ यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर आनंद साजरा केला़जळगाव घरकुल प्रकरणात सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी (दि़ २) दुपारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला़ हे वृत्त समजताच जैन समाजाचे हरीश लोढा, ललित मोदी, नितीन सुराणा, डॉ़ प्रफुल्ल सुराणा, अनिल नहार, रवि पारख यांनी टिळकवाडीतील श्री जैन ओसवाल बोर्डिंग नाशिक संचलित मोहनलाल चंपालाल साखला विद्यार्थी छात्रालयात धाव घेतली़ यावेळी सुनील भटेवरा, पारस लोहाडे, डॉ़ संदीप मंडलेचा, कांतीलाल जैन, सुमतीलाल लुणावत, ललित कोठारी, प्रकाश बोरा, सुनील संकलेचा, अशोक साखला, सुनील बुरड, राजेंद्र संचेती, नीलेश भंडारी आदिंसह जैन समाजबांधव व वसतिगृहातील विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सुरेशदादांच्या जामिनाचे जैन बांधवांकडून स्वागत
By admin | Published: September 02, 2016 11:37 PM