केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. भारती पवार यांचा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मालेगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालघरपासून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे तालुक्यातील सौंदाणे, टेहरे मार्गे मालेगावी आगमन झाले. अमेय लॉन्स येथे त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यावेळी मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यात्रेचे प्रास्ताविक केले. खासदार सुभाष भामरे यांनी केलेल्या कामांचा आराखडा दिला. ऑप्टिकल फायबर प्रकल्प झोडगे येथे सुरू होत असून त्यात ६ हजार स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. जि.प. सदस्य समाधान हिरे यांचेही भाषण झाले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, तालुका अध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील जि..प. सदस्य मनीषा पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, मुकेश झुणझुणवाला, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद पवार, सुधीर जाधव, सुवर्णा देसाई, सलीम पिंजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
सटाणा नाक्यावर स्वागत
मालेगावी सटाणा नाका भागात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगरप्रमुख मदन गायकवाड, दीपक पवार, नितीन पाेफळे, दीपक गायकवाड,युवा गीते, राजेंद्र शेलार, नगरसेविका सुवर्णा शेलार आदींसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.