शहरातील प्रमुख मार्गांवरून किसान संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आली. किदवाई रोडवरील शहिदोंकी यादगार येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कडाडून टीका केली. केंद्र शासनाने पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी नाशिकहून शेकडो वाहनांद्वारे हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. ही यात्रा मंगळवारी (दि.२२) सकाळी मालेगाव तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील टेहरे येथे मुंबई - आग्रा महामार्गालगतच्या हुतात्मा स्मारकाजवळ शेतकऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर यात्रा मालेगाव शहरात दाखल झाली. येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. माळी मंगल कार्यालयापासून शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संघर्ष यात्रेचे प्रमुख माजी आमदार जिवा पांडू गावित, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, माजी आमदार आसीफ शेख, कॉंग्रेसचे नेते प्रसाद हिरे, नगरसेविका शान-ए-हिंद, डॉ. अशोक ढवळे यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. या संवाद यात्रेत माजी आमदार रशीद शेख, आमदार माैलाना मुफ्ती मो. इस्माईल, रिजवान बॅटरीवाला, शिवसेनेचे संजय दुसाने, डी. एल. कराड, डॉ. तुषार शेवाळे, मुस्तकीम डिग्नीटी, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक माजीद शेख, जमात ए इस्लामी, जमिअत ए उलेमा, जमियत ए उलेमाए हिंद, सुन्नी जमियत ए उलमा या धार्मिक संघटनांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एमआयएम, जनता दल, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, मार्कस्वादी कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पार्टी आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इन्फो
मुस्लीम संघटनांचाही सहभाग
या यात्रेदरम्यान शिवसेनेने संगमेश्वरात तर जनता दल व कॉंग्रेसने किदवाई रस्त्यावर तर मुशावरत चौकात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला. विविध मुस्लीम धार्मिक संघटनांनी यात्रेचे स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. किसान संघर्ष यात्रेला पाठिंबा देत माजी आमदार रशीद शेख यांनी देणगी व मदत म्हणून २५ हजार रुपये रोख माजी आमदार जे. पी. गावित यांच्याकडे सपूर्द केले.
फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावित. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपझमहापौर नीलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदींसह पदाधिकारी.
फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.
फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजी
फोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.
===Photopath===
221220\22nsk_14_22122020_13.jpg~221220\22nsk_15_22122020_13.jpg~221220\22nsk_16_22122020_13.jpg
===Caption===
फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.~फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.~फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १७ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी किसान संवाद यात्रेचे सभेप्रसंगी बोलताना माजी आमदार जे. पी. गावीत. व्यासपीठावर माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसीफ शेख, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, मुस्तकीम डिग्नीटी आदिंसह पदाधिकारी.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १८ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेली किसान संवाद संघर्ष यात्रा.फोटो फाईल नेम : २२ एमडीईसी १९ . जेपीजीफोटो कॅप्शन : किसान संवाद संघर्ष यात्रेदरम्यान केंद्र शासनाविरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.