त्यांचे स्वागत मराठा दरबार येथे करण्यात आले. स्वागतासाठी राजेंद्र भोसले, संभाजी ब्रिगेडचे अनिल पाटील, युवक काँग्रेसचे दिनेश ठाकरे, अंधश्रद्धा निर्मूलन राज्याध्यक्ष तानाजी शिंदे, जितेंद्र वाघ, शंकर नागपुरे, शाम शिंपी आदी उपस्थित होते. या मोहिमेत सहा सायकलस्वार विश्वास काशीद, नीलेश धावडे, प्रशांत जाधव, बजरंग मुळक, नारायण मालपोटे, अंशुमन धावडे हे सहभागी आहेत. भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पीएमटी चौक येथून दि.१ जानेवारी शुक्रवारी सकाळी ८ वाजता या मोहिमेस प्रारंभ केला आहे. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्कची योग्य खबरदारी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश-राजस्थान-हरियाणा या मार्गावर १ ते १४ जानेवारी दरम्यान मराठा वॉरियर्स या ग्रुपकडून ही सायकल मोहीम पार पडणार आहे. चार राज्यांचा यामध्ये समावेश असून १६२० किलोमीटर इतके अंतर कापले जाणार आहे. यासाठी १३ दिवस लागणार असल्याचे सायकलस्वारांकडून सांगण्यात आले.
===Photopath===
030121\03nsk_8_03012021_13.jpg
===Caption===
पुणे येथून पानिपतकडे जाणाऱ्या सायकलपटूंचे मालेगावी करण्यात आलेले स्वागत .