शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

By admin | Published: January 01, 2016 10:43 PM

गुडबाय २०१५ : सायकल चालवा अभियानात शेकडो कळवणकर सहभागी

कळवण : २०१६ या नव्या वर्षात कळवणकरांनी नवीन संकल्प केला असून, आम्ही भारतीय कळवण आयोजित सायकल चालवा अभियानाला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला.या अभियानात शहरातील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर पहिल्याच दिवसापासून सायकल चालवा अभियानाला कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ७ वाजता एसटी बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला.अभियानात कमको बॅँकेचे संचालक प्रवीण संचेती, माजी संचालक प्रकाश संचेती, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. के. टी. बागुल, बालरोगतज्ज्ञ दीपक बहिरम, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. रवींद्र भामरे, डॉ. चेतन भावसार, प्रा. एच. के. शिंदे, प्रा. सी. आर. गांगुर्डे, संदीप अमृतकार, बापू कुमावत, राजेंद्र मालपुरे, राजेश मुसळे, बापू पगार, आर. के. एम. माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एल. डी. पगार, ए. डी. गवळी आदिंसह शेकडो युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व मान्यवरांनी सहभाग नोंदविला. सायकल चालवा अभियानाला एसटी बसस्थानकापासून सुरुवात होऊन भाजी मंडई, गांधी चौक, सुभाष पेठ, नेहरू चौक, फुलाबाई चौक, फाशी चौक, सावरकर चौक, मेनरोड, शिवाजीनगर, गणेशनगर भागात कळवणकरांना ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, आरोग्य जपा’ असे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)