पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.नववर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणात आणि शांततामय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे कायम जतन व्हावे याच उद्देशाने पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळाने यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलित करून करण्यात येते. कार्यक्रमाचे संयोजन शिवनेरी युवक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन ढिकले यांनी केले होते. रात्री साडेआठ वाजता सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्यापूर्वी पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परुळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्र म झाला. त्यानंतर पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. मध्यरात्री १२ वाजता स्वामी सखा यांच्या हस्ते प्रज्वलित दीप नदीपात्रात सोडण्यात येऊन सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा संपन्न झाला. या सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केल्याने तसेच नदीपात्रात दीप सोडल्याने संपूर्ण गोदाकाठ उजळून निघाला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन ढिकले, राजेंद्र पाटील, पुष्कर अवधुत, अॅड. अजय निकम, अजय गोसावी, गिरीश कोठुळे, प्रशांत कर्पे, संदीप ताजणे, राजू भोईर, विलास खालकर, जगदीश मान, दिनेश महाजन, बाळू खराटे आदींसह शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नववर्षाचे प्रकाशमान स्वागत : स्वामी मित्रमेळाने जपली परंपरा सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळले रामकुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:18 AM
पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देनववर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणातगेल्या १५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत