लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गुलाबपुष्प देऊन, मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.कळवण : येथील आरकेएम माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थी व विद्यार्थिनींचे ढोलताशांंच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक एन. पी. पवार व पर्यवेक्षक एल. डी. पगार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभानंतर कळवण तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र भावसार यांनी कै. बाळकृष्ण भावसार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले. यावेळी एल. डी. पगार, एन. डी. देवरे, पी. एम. महाडिक, ए. टी. सोनवणे, यू. एस. पाटील, श्रीमती एम. के. पगार ए. डी. गवळी आदी उपस्थित होते.पेठ : कुंभाळे येथील शाळेत जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. राजबारी येथे जि. प. सदस्य हेमलता गावित यांनी शाळा प्रवेशोत्सव दिंडीत सहभाग घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम गावीत, केंद्रप्रमुख मोतीराम सहारे आदी उपस्थित होते. तालुक्यातील खंबाळे, गढईपाडा, हरणगाव, पेठ नं. २, म्हसगण, गारमळ, इनामबारी, मोहपाडा, पेठ नं. २, जांभूळमाळ, कहांडोळपाडा आदी शाळांमध्ये विविध उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे येथील शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावतून दिंडी काढली. रंजना पैठणकर यांनी शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी कचरू मुसळे, संपत गव्हाणे, सुनील मुसळे आदी उपस्थित होते.बेलगाव कुर्हे येथे यावेळी सरपंच वृषाली गुळवे, मालती पवार, रंगनाथ ठाणगे, नामदेव गुळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात नवागतांचे स्वागत
By admin | Published: June 16, 2017 11:49 PM