नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला गेलेल्या श्री निवृत्तिनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखीच्या सोबत असलेले वारकरी, टाळ, पखवाजवादक यांचा राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या श्री निवृत्तिनाथ पालखीचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पालखीचे गडकरी चौकात स्वागत करण्यात आले. राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या वतीने स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने परतीच्या पालखीच्या स्वागतचा सोहळा करून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना हार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या ठिकाणी चहापाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चव्हाटा, श्री स्वामी समर्थ मंदिर कुंभारवाडा, संत गाडगे महाराज दत्त मंदिर, महिला भजनी मंडळ, काशीनाथ वेराळे, लक्ष्मण बोरसे, रघुनाथ सोनवणे, संजय सोनवणे, दत्ता सोनवणे, हभप सोनू विनोद सोनवणे, सुरेखा चक्रवर्ती, रेखा प्रल्हाद सोनवणे, अश्विनी सारंग सोनवणे, विनोद सोनवणे, दिलीप बिडवई, अनंत बिडवई, अविनाश कडवे, लक्ष्मण बोरसे यांचे सहकार्य लाभले आहे.वारकºयांचा यथायोग्य सन्मानपंढरपूरहून परतताना आपल्या वारकºयांचा यथायोग्य सन्मान झाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथसिंग परदेशी यांनी सांगितले. जुने नाशिक परिसरातील राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून परतीच्या पालखी सोहळ्यातील वारकºयांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:15 AM
त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला गेलेल्या श्री निवृत्तिनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखीच्या सोबत असलेले वारकरी, टाळ, पखवाजवादक यांचा राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देभजनी मंडळाचा उपक्रम गडकरी चौकात रंगला सोहळा; परतीचा प्रवास