नायगाव: संबळ पिपाणीचा मंगलमय सुर, फटाक्यांची आतषबाजी हरिनामाचा गजर करत... संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.नागमोडी घाटाची अवघड चढण करत सिन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या पायी दिंडीचे संबळ-पिपाणीच्या मंगलमय धुन वाजवत फटाक्यांची आतषबाजी करून हरिनामाचा जयघोष करत पास्ते ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. येथील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात त्र्यंबकराजाची पालखी विसावली. यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊलाल घुगे, पंढरिनाथ घुगे, सोपान घुगे, दिगंबर घुगे श्रीधर आव्हाड, सुभाष घुगे, सुदाम आव्हाड, रामकृष्ण आव्हाड, शांताराम आव्हाड आदींनी दिंडीचे स्वागत केले. सकाळ पासुन पास्ते, जामगाव, खापराळे, सरदवाडी, नायगाव, जायगाव आदी गावातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भजनी मंडळ व ग्रामस्थांनी वाराकºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो वारकºयांबरोबर भाविकांनीही भोजनानंतर भजनाचा आनंद घेतला. यावेळी भजनी मंडळातील सदस्यांसह सरपंच गोरख हांडे, उपसरपंच शरद आव्हाड, गोपिचंद आव्हाड, गणेश घुगे, शिवाजी घुगे, गोरख आव्हाड,राजु आव्हाड,जगन आव्हाड, माजी सरपंच नवनाथ घुगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पास्ते येथे निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 5:39 PM